वि...
लेखक – प्रवीण खापरे
दिग्दर्शक – प्रवीण खापरे
वर्तमानातील वैचारिक द्वंद्व प्रतिपादित करताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा आडोसा घेत सादर करण्यात आलेले ही नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ मध्ये हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत करण्यात आला होता. त्यावेळचे परीक्षक प्रसिद्ध समीक्षक पी. डी. कुळकर्णी यांनी या नाटकाचे तोंड भरून कौतुक केले होते. अशा प्रकारचे नाटक अत्यंत दुर्मिळ असल्याचे वक्तव्य करतानाच मांडणी अत्यंत वेगळी असल्याने ही नाटक लक्षवेधक ठरण्यासोबतच प्रेक्षकांच्या मनातील वैचारिक क्रौर्याला शह देत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. प्रेक्षकांनीही नाटकाला डोक्यावर घेतले होते आणि म्हणूनच केवळ प्रेक्षकांच्या आग्रहाखातर नागपुरात दर वर्षी एक प्रयोग करावा लागत आहे. आजवर या नाटकाचे ५ प्रयोग सादर झाले आहेत. लवकरच हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येणार आहे. पुणे व मुंबईच्या प्रेक्षकांसाठी हे नाटक वैचारिक पर्वणी ठरणार आहे.